Understanding Herd Immunity and Dilemma of Opening up Economy
(Post dated 22 April 2020, data and percentages are as per information available then)
देश पूर्ण लॉक-डाऊन होऊन आता महिना होत आलाय, कोरोना वायरस च्या केसेस वाढतच चाललेल्या आहेत, आपला वाढीचा दर कमी दिसतोय तरी, exponential नाही पण compounding (!) आहे जो त्यातल्या त्यात कमी वाईट.
सगळी इकनॉमिक अॅक्टिविटी बंद असल्या मुळे एक खूप मोठा वर्ग, कदाचित देशाची majority of the population, हा सर्वात जास्त affected आहे, रोजंदारीवर काम करणारे आणि त्यांचे कुटुंब यांचे काम आणि मिळणारा पोट भरण्यासाठीचा पैसा थांबलाय.
त्यानंतर नोकऱ्या असणारा मध्यम - उच्च मध्यमवर्ग, अजून तरी ठीक परिस्थितीत आहे, सरकारी नियमांमुळे पगार व नोकऱ्या आहेत, काही कंपन्या, भामटे, लोकांना काढत आहेत, पण अजून या वर्गाला तशी झळ नाही पोचलेली.
आणि मग श्रीमंत/मोठे व्यावसायीक ज्यांचे बिझनेस इन्कम थांबले/कमी झाले आहे पण खर्च चालू आहेत. ह्यांचा त्रास वेगळ्या प्रकारचा आहे, नुकसान भरपूर होत आहे, worst case scenario मध्ये हे बिझनेस बंद करून हात वर करू शकतात.
वरचे ढोबळ वर्गीकरण आहे, पोस्टचा उद्देश वेगळा आहे त्यामुळे मी सोपे ठेवायचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक वर्गाची झळ सोसण्याची capacity वेगवेगळी आहे, श्रीमंताना वैद्यकीय उपचार मिळतील पण त्याचं बिझनेस उद्ध्वस्त होऊ शकतो तर सर्वात गरीब सरळ उपाशी सुद्धा मरू शकतो / मरतोय. आणि हे वेगवेगळ्या intensity ने जगभर चालू आहे. त्यामुळे आपल्या कानावर सध्या एक बरेच पडतेय की economy चालू करा, सगळ्यांना ‘नॉर्मल’ कामे सुरू करू द्या, बहुतेकांना इन्फेक्शन होईल आणि Herd Immunity तयार होऊन वायरसचा संहार कमी होईल किवा थांबेल.
Herd Immunity दोन प्रकारे तयार करता येते:
- Mass Vaccinations - ideally of entire population, practically at-least 65%-75%
- प्रत्येकाला वायरसची लागण होत होत सर्वांपर्यन्त पसरून आणि प्रत्येकाने नीट होऊन (किवा #मरून)
Vaccine यायला साधारण दीड ते दोन वर्षे लागू शकतील असे मानले जात आहे. त्यामुळे उरतो तो दूसरा आणि एकमेव मार्ग, प्रत्येकाने इनफेक्ट होणे; बाहेर गर्दीत पडलो की आज ना उद्या प्रत्येकाला होणार आहे, ह्या वायरसची प्रसार क्षमता त्याच्या मारक क्षमतेपेक्षा खूप जास्त आहे.
बहुतेक काम करणारा वर्ग, तरूण आणि विद्यार्थी यांना तसा भयानक धोका नाही, जवळ जवळ 80% लोकांना काही symptoms सुद्धा नसतात, आपले शरीर infect होते आणि वायरसला मारून immunity मिळवते. आणि उरलेल्या 20% किवा अजून कमी लोकांना symptoms दिसतात आणि death rate देखील खूप कमी आहे, जरी नक्की आकडा अजून समजत नसला आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळी टक्केवारी दिसतेय तरी इतर काही वायरस कोरोना पेक्षा जास्त वाईट आहेत/होते.
मग जर मृत्युदर कमी असेल तर घाबरायचे का असा एक सुर असतो, आणि पुढचे, थोड्या लोकांची कुर्बानी गेली तर काय हरकत आहे जगा-करिता असे विचारले / बोलले जाते - पण प्रत्येकाचा त्यामागचा उद्देश वेगळा असतो - गरीब म्हणेल की माझ्या पोरांना खायला तरी मिळेल, मध्यमवर्ग त्यांचे कर्जाचे हप्ते सुटतील आणि बरी लाइफस्टाईल चालू ठेऊ शकेल आणि बिझनेस - नुकसान टळेल किवा फायदा होईल. हे वरवर सोपे, उपयोगी आणि लॉजिकल वाटते.
पण गोची अशी आहे की आपला मेंदू, खूप मोठे आकार, आकडे, काळ विचार करण्यात evolve झालेला नाही. एवरेस्ट किती उंच असेल, किवा 10,000 वर्षे म्हणजे नक्की किती, किवा Human brain, $ 2.5 billion म्हणजे किती आणि त्यांचे आपण काय करू शकतो याचा विचार करायचा प्रयत्न करा फक्त. (मध्येच थोडे digress झालो
)
तर भारतात Herd Immunity करायची झाली आणि त्यातले किती मरतील याचा एक अंदाज बांधायचा प्रयत्न करू:
आपली लोकसंख्या: 135 crore (1.35 billion)
- साधारण 70% इनफेक्ट*: 94.5 crore (945 million)
- @ मृत्युदर 5%*: 4.75 crore
- @ मृत्युदर 2%*: 1.9 crore
(*This is just an approximation used as an example, I have assumed the numbers 70%, 5%, 2%, these could vary as there is no accurate information available for the spreading speed of the SARS-COV2 Virus as well as time horizon for availability of a vaccine and eventual mass vaccination completion).
अजूनही हे मृत्यूचे आकडे डोक्यात नाही शिरत ना? नाही, कारण ते अवघड आहे. त्याच्या पुढची भयाण fact म्हणजे हे मृत्यू अगदी थोड्या कालावधीत होतील/होऊ-शकतील - काही आठवडे ते काही महीने फक्त!
हे आकडे एव्हढे मोठे आहेत की आपणच काय, जगातला कुठलाही देश या पेशंट वर उपचार एकाच वेळी नाही करू शकत, हॉस्पिटल ओसंडून वाहतील, कोणाला उपचार द्यायचे आणि कोणाला नाही हा अतिशय वाईट निर्णय घ्यावा लागेल (इटली मध्ये काही ठिकाणी नाईलाजाने वृद्धांचे उपचार (ventilators) तरूण पेशंट करता थांबवावे लागले). डॉक्टर आणि इतर कर्मचारी इनफेक्ट होतील, त्याने आरोग्यव्यवस्थेवर अजून ताण येईल, स्मशानभूमी अविरत चालू रहातील, धुराची नळकांडी (smoke plumes) आकाशात दिसत रहातील.
सरकारने लॉक डाऊन केला आहे तो या वायरसचा प्रसार थांबवण्याकरीता / हळू होण्याकरिता. कामे सुरू झाली की परत infection सुरू होतील/वाढतील.
तर मग याच्यावर solution काय? माझ्याकडे नाहीये उत्तर, अमेरिके-सारख्या देशाकडे देखील नाहीये. Vaccine येई पर्यन्त बहुतेक काम सुरू - बंद - लॉक-डाऊन असे प्रकार एका पेक्षा जास्त वेळा करावे लागतील. There is NO “one size fits all” solution, प्रत्येकाला ट्रायल-एरर पद्धतीने ठेचा खात पुढे जावा लागणार आहे.
यात आपण स्वतः काय करू शकतो? तर आता जे स्वच्छतेचे, मास्क घालण्याचे उगा बाहेर न फिरण्याचे उपाय आहेत ते अवलंबावे लागणार आहेत, बऱ्याच मोठ्या काळा साठी.
आपण करू शकू हे, सध्या थोडे जसे हवे तसे होत नाहीये, पण होईल, लोकांना जाण येईल, स्वतः समजून घ्या आणि इतरांनाही सांगा.
(मी या पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी लिहितोय, कारण आजूबाजूला दिसतेय की लोकांना खरेच नीटसे माहीत नाहीये - काहींना उपयोग झाला तर ठीकच आहे)
#MANE_VIRUS_COVID_19 - 46 Herd Immunity and opening up dilemma
Stay Home Stay Safe
© Virendra Mane, Pune, 2020+
First published on Facebook - https://www.facebook.com/virendra.mane/posts/10215890141757444