Tuesday, April 27, 2021

साथीच्या रोगांच्या, महामारीच्या लाटा का येतात

(आनंद मोरेंनी लाटा का येतात अशी पोस्ट केली, माझ्या परीने सोप्यात सांगायचा हा प्रयत्न (Disclaimer: I am not an expert and some of the information mentioned in the post below may be due to my inexperience/lack of proper understanding - so please do point-out any inaccuracy/mistakes).

काही संज्ञा आधी सांगतो:
  • साथीचा आजार - Infectious Disease - जो आजार एक व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीला दिला जाऊ शकतो
  • Pathogen - आजारा साठी कारण असलेले जिवाणू/विषाणू (Bacteria, Viruses and few others)
  • साथ - आजार जो अगदी कमी कालावधीत खूप जास्त लोक आजारी / मृत्युमुखी पडतात. (note: साथ पसरत नसते, तर pathogens पसरत असतात)
  • Epidemic - महामारी - आजारी लोकांचे प्रमाण एकाएकी अति प्रचंड प्रमाणात वाढणे
  • Pandemic - World wide Epidemic - जागतिक महामारी
  • Patient Zero (0) - जो पहिला आजारी पडला, पहिली व्यक्ती जिच्यात pathogen शिरला
---
पृथ्वीवरचे सर्व जीव हे जगण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात, parasites तर दुसऱ्या जीवांच्या आत मध्ये रहातात. Pathogens देखील असेच वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरावर असतात. आपल्या त्वचेवर कित्येक जिवाणू रहात असतात, नवीन जिवाणू कायम येत असतात आणि हे एकमेकांशी मारामारी करून जगायचा प्रयत्न करत करतात, त्यात आपले शरीर देखील या जिवाणूशी “खेळत” असते, स्वतःला वाचवण्याकरिता किवा उपयोग करून घेण्याकरिता.
हे असेच जंगलातल्या प्राण्यांसोबत देखील कायम घडत असते, पण आपला त्यांच्याशी फारसा संबंध येत नाही/नसतो. कधीतरी असे होते की एखादा विषाणू, जो अशा एखाद्या प्राण्यावर आहे आणि त्यांचे ठीकठाक चालू आहे (म्हणजे त्या प्राण्याला काही त्रास नाही), तो प्राणी मनुष्याच्या संपर्कात येतो, बहुतांश वेळा त्यांना खाण्याकरिता पकडून आणले असल्यामुळे, कधी चावा घेतल्यामुळे, इत्यादि. हा विषाणू जर त्या मनुष्यासाठी हानिकारक असला, (ती व्यक्ती आजारी पडली वा मरण पावली), तर ही व्यक्ती Patient Zero.
हा पेशंट झीरो त्याला झालेला आजार त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना pass-on / बाधित करू शकतो. याचे विविध मार्ग असतात. Direct - ज्या मध्ये विषाणू शरीरातल्या द्रावावाटे वा हवेवाटे दुसऱ्याला जातात (शिंकणे, लाळ, सेक्स, etc.), आणि Indirect - मध्यस्था मार्फत - उदा. डास बाधित व्यक्तीला चावतो, त्याच्यातले विषाणू घेतो आणि दुसऱ्याला चावताना तिथे सोडतो (मुद्दाम नाही, आपोआप होते). पाण्यामार्गे - कॉलेरा, प्लेग - उंदरांमुळे नाही तर त्यांच्यावर राहणाऱ्या पिसवांमध्ये असलेल्या Yersinia pestis बॅक्टीरिया मुळे होतो.
आता आणखी काही संज्ञा, या महत्वाच्या आहेत (SIR), कुठल्या ही साथीत लोकांना या तीन category पैकी एकात ठेवता येते:
  • Susceptible (S) - आजार होऊ शकणारी व्यक्ती
  • Infected (I) - अशी व्यक्ती जिला सध्या आजार झालेला आहे
  • Removed (R) - आजारातून बरी झालेली आणि त्यातून रोग प्रतिकारशक्ती (immunity) मिळालेली, Vaccine / लस घेऊन रोग प्रतिकारशक्ती तयार केलेली, आणि मरण पावलेली व्यक्ती
Population मध्ये किती Susceptible आहेत त्यावर एखादा आजार किती पसरू शकतो हे ठरते. उदा. AIDS/HIV हा नवीन आजार जेव्हा आला, तेव्हा सर्व जगच Susceptible होते. पोलिओचा विषाणू समजा एखाद्या ठिकाणी कसा तरी आला तरी त्याला Susceptible population मिळणार नाही कारण सगळे Removed (प्रत्येकानी लस घेतलेली असते) असणार आहेत आणि त्यामुळे पोलिओ पसरणार नाही
Patient Zero / आजार - एक व्यक्ती किती लोकांना पसरवू शकते, किती दिवस प्रसार करण्यालायक असते आणि किती वेळात पसरवते (खूप कमी किंवा खूप जास्त) यावर याचे साथीत रूपांतर होते की नाही हे ठरते.
उदा. Seasonal Influenza/Flu (सर्दी) - विषाणू शरीरात शिरल्यावर फार तर एखाद दिवसांतच वाढू लागतो, १-२ दिवसच व्यक्ती दुसऱ्यांना infect करू शकते, आणि Immune system विषाणूला लगेच संपवते. हा आजार खूप वेगाने पसरतो, पण खूप जास्त लोकांना झाल्यामुळे Susceptible लोक कमी होऊ लागतात आणि यांची साथ संपते.
दुसरे उदाहरण, इबोला, या विषाणू ची लागण झाल्यावर २ दिवस ते ३ आठवडे एवढा मोठा काल लक्षण दिसण्यास लागतात, मात्र याचा मृत्यूदर अतिशय जास्त आहेत २५% ते ९०% - अॅवरेज ५०%. पण असे जे आजार असतात ज्यात अति भयानक त्रास, लक्षणे, आणि मृत्यू असतात, ती लोक बाहेर फिरुच शकत नाहीत, Susceptible भरपूर असले तरी त्यांच्या पर्यन्त पोहोचू शकत नाही. त्यामुळे देखील अशा साठी लवकर आटोक्यात येतात. Host (infected person) मारणारा विषाणू जास्त पसरु शकत नाही.
आता आपण या पोस्ट च्या मूळ गाभ्याकडे वळू, लाटा का येतात. त्या आधी त्यांना लाटा का म्हणतात हे देखील समजून घेऊ यात, जर दर दिवसाला सापडणाऱ्या नवीन केसेस (आकडा) Y-axis वर आणि X-axis वर काळ / period याचा चार्ट काढला तर तो इमेज मध्ये आहे तसा दिसतो, हे चार्ट लाटांसारखे दिसतात.


परत काही संज्ञा:
  • Seasonality: हवामानाचा आजारावर/विषाणू वर होणारा परिणाम. फ्लू हा समशीतोष्ण प्रदेशांमध्ये (temperate climate zones) थंडी मध्ये जेव्हा तिथली आर्द्रता कमी होते तेव्हा पसरतो. तसेच उन्हाळ्या मध्ये डास वाढले की मलेरिया वाढतो.
  • Cycles: केसेस वाढणे आणि कमी होणे हे परत परत किती वेळा होते.

(HIV, TB सारखे आजार आहेत त्यांच्यावर Seasonality चा फरक पडत नाही, हे आजार आता कायम एका constant range मध्ये असतात. यांच्या cycles नसतात)
दर थंडी मध्ये फ्लू चा वायरस रूप बदलून (mutation/variant) येतो, आपल्याला आधी फ्लू होऊन गेला असेल आणि त्याची immunity जरी असेल तरी या नवीन रूपाला आपण तोंड देऊ शकत नाही आणि आजारी पडतो, म्हणजेच Susceptible नेहेमी उपलब्ध असतात त्यामुळे दर वर्षी फ्लू ची साथ/लाट येतच रहाते.
कॉलेरा देखील असाच, हा पाण्यातून पसरतो. जिथे पिण्याचे पाणी या जिवाणू मुळे दूषित होते तिथले लोक आजारी पडतात. पूर्वी नदी चे पाणी प्यायले जायचे, त्यामुळे वर कुठे कॉलेरा झाला तर खालील गावांमध्ये देखील पसरत असे. बांगलादेश मध्ये कॉलेरा वर्षातून दोनदा येतो (two cycles), पहिली येते spring मध्ये जेव्हा हिमालयातील बर्फ वितळून पाणी वाढते आणि पसरते. आणि दुसरी येते मॉन्सून चा जोर कमी झाल्यावर आणि नद्यांचे पाणी ओसरू लागल्यावर. कॉलेरा ची immunity जास्त महीने टिकत नाही, त्यामुळे परत परत होत राहतो. गरीब देशांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे, सांडपाणी व्यवस्थापन नसल्या मुळे.
गोवर (Measles) ची लाट/साथ (Europe मध्ये) मात्र दोन वर्षांनी येते, हे जरा विचित्र वाटते. गोवर ची लस सगळ्यांना दिली गेलेली असते, दोनदा घ्यावी लागते. महायुद्धा नंतर यूरोप मधला जन्मदर (birth rate) हा वर्षाला साधारण २०% पर्यन्त खाली आला. वर सांगितल्या प्रमाणे साथ पसरण्यासाठी Susceptible population एका ठराविक threshold च्या वर असावे लागते, पण vaccines मुळे Removed जास्त असतात, तिथे या २०% जन्मदरामुळे दोन वर्षात साधारण 44% नवीन Susceptible येतात. आणि मग यांची साथ पसरते आणि लाट येते. त्यातही ही लाट जर सुटी च्या कालावधी मध्ये असेल तर कमी येते आणि शाळा चालू असताना आली तर मोठी. फ्लू पसरण्यास देखील तिकडच्या शाळांचे Autumn मध्ये सुरू होणे, थंडी मुळे लोक indoor जास्त काळ एकत्र असणे कारणीभूत ठरते.
पश्चिम आफ्रिकेत गोवर ची लाट पावसाळी हवामानात येत नाही, तर तेथील कमी आर्द्रतेच्या, खरे तर कमी पावसाच्या/कोरड्या काळात येते, याचे कारण मात्र थेट हवामान नाही, तर पावसात कामे कमी असतात म्हणून लोक आपापल्या गावी/खेड्यात पसरलेले असतात आणि पाऊस संपला की शहरी भागांकडे गर्दीत येतात आणि लाट सुरू होते.
जेव्हा लाट ओसरलेली असते तेव्हा pathogen संपलेला नसतो, शून्य (0) नसतो, तो लोकांमध्ये असतोच पण पसरण्याचा वेग अतिशय कमी असतो.
आता शेवटचे उदाहरण, देवी, कोणाला आठवते आहे? या आजारचे आपण पूर्ण उच्चाटन केले आहे, शेवटचा virus देखील मारून टाकलेला आहे, त्यामुळे हा परत येणार नाही, बऱ्याच देशांनी यांची लस देणे देखील बंद केले आहे. पोलिओचे देखील असेच करायचे आहे, पाक-अफगाण सीमेवर आणि आफ्रिकेतल्या एक दोन छोट्या देशांमध्ये लस देण्याला टोळ्या / अतिरेकी विरोध करतात यामुळे सर्व जगाला पोलिओ ची लस घ्यावीच लागते.
आणि आता कोरोना / कोविड-19, हा अगदी नवीन आजार आहे, परत पूर्ण जग Susceptible आहे, आणि काही तासांत हा विषाणू एका देशातून दुसऱ्या देशांत पोहोचू शकतो (विमान प्रवास), यांची प्रसार क्षमता खूप जास्त आहे, याला देखील seasonality आहे. Covid-19 येवढा धोकादायक नसला (low death rate) तरी कुठल्याही देशाचे medical infrastructure हाताळू शकणार नाही इतक्या प्रमाणात पेशंट ना हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागत आहे. ऑक्सिजन , ventilator देखील या प्रमाणात कोणी तयारी करून ठेवत नाहीत. जो पर्यन्त जास्तीत जास्त लसीकरण होत नाही तो पर्यन्त या आजाराच्या लाटा येतंच राहणार. त्यानंतर कदाचित* मग हा seasonal फ्लू सारखा होऊन जाईल.
आणखी काही माहिती: दुसरी लाट पहिली पेक्षा मोठी असते, याचे कारण pathogen पहिल्यांदा जगभर पसरायला वेळ लागतो तर दुसऱ्या लाटेत तो सगळीकडे असतो. तसेच पहिली लाट Seasonality प्रमाणे कधी सुरू झाली होती हे सुद्धा एक कारण असते.
* कदाचित - या बद्दल नंतर कधीतरी.
#MANE_VIRUS_COVID_19 141 Why Waves - लाटा का येतात
🙏 Wear Double Masks, Stay Home, Stay Safe 🙏
© Virendra Mane, Pune, 2021+
First published on Facebook - https://www.facebook.com/virendra.mane/posts/10218342784951991


Research Paper on Corona Seasonality in India and causes published

सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की “कोरोना / कोविड-19 ची Seasonality आणि भारताच्या September-2020 पासून केसेस कमी होण्याचे कारण” या विषयावरचा ...